अभिनेत्यांपेक्षा त्यांच्या मॅनेजर्सचाच तोरा जास्त असतो - एकता कपूर

Update: 2018-09-24 14:25 GMT

बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यामध्ये तिने आपल्या बॉलीवूडमधील कामाबाबतचे अनेक धक्कादायक अनुभव सांगितले. तिला यावेळी छोट्या पडद्यावर यश संपादन केल्यानंतर चित्रपट निर्मितीमध्ये उतरणे किती आव्हानात्मक आणि अवघड होते? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर तिने तिचा अनुभव सांगताना सांगितले की, “छोट्या पडद्यावर यशस्वी झाल्यानंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु येथे फक्त आणि फक्त माझाच निर्णय चालणार नाही हे मी ओळखले होते. चित्रपटाचा दिग्दर्शक, लाईन प्रोड्यूसरसह अनेक लोकं याठिकाणी असतात. त्यानंतर मोठ-मोठे कलाकार आपल्याला हवी तशी कथा आणि स्किप्टमध्ये फेरबदल करतात. म्हणून मी आतापर्यंत जास्तीत-जास्त छोट्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. अभिनेता अजय देवगनसोबत केलेलीवन्स अपॉन अ मुंबईहा माझा पहिला मोठा चित्रपट होता. या चित्रपटाची निर्मिती आरामात झाली होती. अजय देवगन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन लुतरिया हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. ज्या कलाकारांना खरंच काम करण्याची इच्छा असते, जे माझ्या कामाची इज्जत करतात आणि कामात ढवळाढवळ करत नाही अशाच लोकांसोबत मी जास्त काम केले आहे. मोठ-मोठ्या कलाकारांपासून मी लांब राहते कारण मी त्यांना सांभाळू शकत नाही असे मला वाटते.”

आपल्या वाईट अनुभवाबाबत बोलताना एकताने सांगितले की, “ अभिनेत्यांपेक्षा त्यांच्या मॅनेजर्सचाच तोरा जास्त असतो.”

Similar News