#MeToo बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत - राधिका आपटे

Update: 2018-10-23 14:45 GMT

#MeToo मोहिमेनंतर अनेकांनी लैंगिक शोषणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. आता सर्वांपाठोपाठ अभिनेत्री राधिका आपटे हिने देखील आपले मत व्यक्त केले आहे.

तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, #MeToo च्या माध्यमातून लोक लैंगिक शोषणाबद्धल बोलत आहेत ही खूपच चांगली गोष्ट आहे. हा विषय जितका संवेदनशील आहे, तितकाच गुंतागुंतीचा आहे. त्यामुळं तो अत्यंत काळजीपूर्वक हाताळला हवा. #MeToo च्या माध्यमातून अनेक लोक लैंगिक शोषणाबद्दल बोलत आहेत. अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत.

आता ज्वालामुखी उसळून बाहेर यावा तशा नवनव्या गोष्टी बाहेर येत आहेत. पण हे केवळ हिमनगाचं टोक आहे. अजून बरंच काही चव्हाट्यावर यायचं आहे, दरम्यान, कामाच्या ठिकाणीच काय, खासगी आयुष्यात कुठही असले प्रकार घडू नयेत, असंही तिनं म्हटलं.

Similar News