महिलांचे सक्षमीकरण व्हावे हा उद्देश उराशी बाळगून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने २३ सप्टेंबर रोजी अंबाडी येथील रुद्रा कॉम्प्लेक्स मध्ये या कापड उद्योगाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक महिला सक्षम-सशक्त होईल हवी आपल्या संसाराचा गाडा सुखाने पुढे नेता यावा हा उद्देश समोर ठेऊन हा उपक्रम सुरू केला असल्याचे मत यावेळी निलेश सांबरे यांनी व्यक्त केले.
ज्यापद्धतींनी गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागामध्ये डॉ बाबा आमटे यांनी संपूर्ण परिवारास घेऊन ग्रामीण भागात कार्य करत आहेत, त्याचप्रमाणे ठाणे-पालघर जिल्ह्यातील जनतेच्या दुःख, दारिद्र्य, बेरोजगार संपुष्टात आणण्याचा प्रामाणिक निस्वार्थी प्रयत्न निलेश सांबरे यांनी चालू केला असल्याचे मत डॉ हेमंत सवरा यांनी व्यक्त केले.