केवळ आरक्षण दिल्यानेच समाज बदलणार आहे का - सुमित्रा महाजन

Update: 2018-10-02 06:51 GMT

देशात आरक्षण मुद्द्यामुळे अनेक राज्यात अनेक मोर्चे, आंदोलन करण्यात आले. याबाबत पहिल्यांदाच लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आपली भूमिका मांडली. लोकमंथन कार्यक्रमात काल त्यांनी आरक्षणाबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले, तसेच काही प्रश्न देखील उपस्थित केले.

सुमित्रा महाजन म्हणाल्या की, समाजाचा समान विकास व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दहा वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती, पण आज स्थिती काय आहे? आपण सतत आरक्षणाला मुदतवाढ देत आहोत. दर दहा वर्षांनी आणखी दहा वर्षांसाठी आरक्षणाला मुदतवाढ देण्यात आली. एकदा तर ती २० वर्षे करण्यात आली. हे असे कुठपर्यंत चालणार? आरक्षणाला अशी मुदतवाढ देण्यामागे नेमका हेतू तरी काय आहे, सामाजिक समरसतेच्या गोष्टी सांगितल्या जातात, पण केवळ आरक्षण दिल्यानेच समाज बदलणार आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

त्यानंतर पुढे त्या म्हणाल्या की, ज्यांना आरक्षण मिळाले त्यांनी आणि ज्यांना मिळाले नाही त्यांनी, दोघांनीही चिंतन करण्याची गरज आहे. मला आरक्षण मिळाले, पण त्यानंतर माझ्या समाजासाठी मी काय केले याचा कुणी विचार केला आहे का? शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले तर खरोखरच आपला देश समृद्ध होईल का असा सवाल व्यक्त करुन त्यांनी आपली आरक्षणासंदर्भातील भुमिका स्पष्ट केली.

Similar News