आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उदयनराजेंवर टिकास्त्र सोडले. त्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत आपले मत व्यक्त केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही. पण तो निर्णय अद्याप झालेला नाही. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता. अन्यथा आम्ही तिकीट लादू शकलो असतो, आता कार्यकर्त्यांचे मतं आम्ही जाणून घेतलं आहे. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर उमेदवार निवडले जातील, असे त्या म्हणाल्या.