मासिक पाळीत Menstrual Cup कसा वापरावा ?

Update: 2019-01-05 11:53 GMT

सॅनिटरी नॅपकिनला उत्तम आणि सोयीस्कर असा एक पर्याय म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. हा कप वापरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवस त्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नसते. पाळी म्हटली की मूड स्विंग्स, पोट फुगणे, ओटीपोटात कळा, कंबरदुखी अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रिया त्रस्त असतात. त्यातच कपड्यामुळे ओलेपणा, डाग पडण्याची भीती यामुळे स्त्रीला आजारी असल्यासारखे वाटते. डिस्पोजेबल पॅड रक्त शोषतात व त्यामध्ये जंतू वाढतात. पॅडला दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या सुगंधी रसायनांमुळे अपाय होण्याची शक्यता असते. याउलट मेनस्ट्रुअल कपाची रक्ताशी कुठलीच प्रक्रिया होत नाही व ते कपाला फारसे चिकटतसुद्धा नाही. परंतू हा कप नक्की वापरायचा कसा याबाबतची चर्चा केली आहे सीमा परदेशी यांच्यासोबत...पाहा हा व्हिडिओ -

मासिक पाळीत Menstrual Cup कसा वापरावा ?

Full View

Similar News