इंडोनेशिया एशियाडमध्ये दोन रौप्य आणि एक सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या भारताची सुवर्णकन्या हिमा दास हिचे दिल्लीहून स्वघरी, आसामला, परतताना जंगी असे स्वागत करायची तयारी पूर्ण केली आहे.
उद्या हिमा दास हिचे एअरपोर्टवर आगमन झाल्या झाल्या तिथून बाहेर पडेपर्यंतचा पूर्ण मार्ग हा प्रत्यक्ष हिमा दास हिने गाजवलेल्या ऍथलेटिक ट्रॅक असल्याप्रमाणेच सजवण्यात आला असून तिथून बाहेर पडल्यावर लाखो लोकांच्या साक्षीने हिमा दास हिची आसाम भवनापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे.संध्याकाळी राजभवनात हिमा दास हिच्या सन्मानाप्रीत्यर्थ शाही सरकारी कार्यक्रम होणार आहे.