माजी खासदार प्रिया दत्त यांना कालच त्यांच्या पक्षाच्या सचिवपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. यानंतर कॉंग्रेस त्यांना आणखी एक धक्का देणार असल्याचे जाणवत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्याऐवजी दुसर्याच कोणाला उमेदवारी देणार असल्याची शक्यता आहे.
प्रिया दत्तांच्या जागी हि उमेदवारी अभिनेत्री नगमा यांना देणार येणार आहे अशी शंका आहे. या आधी नगमा यांनी काँग्रेससाठी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक यासारख्या ठिकाणी अनेक रोड शो देखील केले आहेत. तसेच काँग्रेसच्या मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघात रविवारी पक्षाची बैठक घेण्यात आली होती व या बैठकीत नगमा यांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे आता याबाबतची शंका आणखी वाढली आहे.