काँग्रेस आमदारांची पंतप्रधानांवर टिका करताना जीभ घसरली...

Update: 2018-10-26 10:02 GMT

सोलापूरमधील एका कार्यक्रमात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टिका केली. ज्यामुळे त्यांना सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. त्यांनी मोदींबाबत टिका करताना आपल्या देशात मोदीबाबा नावाचा डेंग्यूचा मोठा डास आला आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले.

त्या आपल्या भाषणात म्हणाल्या की, आपल्या देशात सर्वात मोठा डेंग्यूचा डास आला आहे, त्यांचं नाव आहे मोदीबाबा, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आजार होतोय. तसेच त्यांनी सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्याबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेसच्या काळातील केलेल्या कामाचं उद्घाटन दोन्ही मंत्री आणि बेवडा खासदार करत आहे असे म्हणून त्यांनी शरद बनसोडेंना बेवडा म्हणून उल्लेखले.

इतक्या उच्चशिक्षित महिला आमदार असून हेरवी सभ्यता, संस्काराबाबत ज्ञान देणाऱ्या काँग्रेस आमदाराने केलेल्या या विचित्र वक्तव्याबाबत आश्चर्यच वाटते.

Similar News