भाजपच्या प्रज्ञासिंहने शहीद आणि पोलिसांचा अपमान केला तरी 'चौकीदार' गप्पच ?
२००८ च्य़ा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षातर्फे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.या उमेदवारीनंतर आजारी असल्याचे सांगून जामीनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंह या उमेदवारी कशी करू शकतात, असा सवाल उपस्थित करीत याबाबत या स्फोटात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे.सोशल मिडियासह राजकीय पक्षांनीही साध्वीवर टीकेची तोफ डागली असून यासंदर्भात मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जाते आहे.
काय म्हणाली साध्वी प्रज्ञासिंह ?
हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असून त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे वक्तव्य साध्वींनी केले होते. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले असल्याचे अतिशय धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चूकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप प्रज्ञासिंह यांनी केला होता. तसचे करकरे हे देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते असे वादग्रस्त विधानही साध्वींने केले होते.