मुंबई : आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी ट्विटरवर तिचे विचार प्रकट करत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती ट्विटरपासून लांब आहे. करिना आणि सोनम कपूरच्या 'विरे दी वेडींग' या चित्रपटानंतर ती फारसी ट्विटरवर अॅक्टिव नाही. @रियली स्वरा सर्च केल्यावर काहीच दिसत नाही. त्यामुळे स्वराने ट्रोलिंगला कंटाळून तिचं ट्विटर बंद केल्याचे केला की काय असा प्रश्न उभा राहतो.
यासंदर्भात पीटीआयच्या दिलेल्या माहितीनुसार स्वरा भास्कर युरोपात सुट्टीवर आहे. ती भारतात परत आल्यानंतर आपलं ट्विटर हँडल करणार आहे. असे ती यावेळी म्हणाली.