आतिशी विरूद्ध गंभीर आरोप-प्रत्यारोपांचा सामना

Update: 2019-05-09 15:29 GMT

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात सध्या आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालीय. आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याविरोधात भाजपचे गौतम गंभीर हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार गंभीर यांनी आपल्याविरोधात अपमानास्पद प्रचारपत्रकं वाटल्याचा आरोप आतिशी यांनी केलाय. तर हे आरोप सिद्ध झाल्यास निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी असल्याचं गंभीरनं म्हटलंय.

गौतम गंभीर जेव्हा विरोधातील संघाविरोधात चौकार-षटकार ठोकायचा तेव्हा आम्हांला आनंद वाटायचा. मात्र, हाच गंभीर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करेल, असं वाटलं नव्हतं, अशा शब्दात आपच्या नेत्यांनी गंभीरवर टीका केलीय. माझ्याविरोधात अपमानास्पद मजकूर असलेली पत्रकं वाटणारे हेच लोकं उद्या खासदार झाल्यावर आपल्या भागातील महिलांचं काय रक्षण करणार, असा प्रश्न आतिशीने विचारलाय. #IStandWithAtishi असा हॅशटॅग वापरून नेटिझन्सकडून आतिशीच्या समर्थनार्थ ट्विट केले जात आहेत.

माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे न दिल्यास त्यांच्याविरोधात निश्चितपणे अब्रुनुकसानीचा दावा दावा दाखल करणार असल्याचं गंभीरनं सांगितलंय. मी कुणाविरोधातही नकारात्मक वक्तव्य केलेलं नाही. माझ्याविरोधात त्यांनी पुरावे दिले तर मी आता तात्काळ राजीनामा देईल. मात्र, जर त्यांनी २३ मे पर्यंत पुरावे दिले तर त्याच दिवशी मी राजीनामा देईन. परंतू, अरविंद केजरीवाल हे पुरावे देऊ शकले नाहीत, तर त्यांनी २३ मे ला राजकारणातून कायमची निवृत्ती घ्यावी, असं आव्हान गौतम गंभीरनं अरविंद केजरीवाल यांना दिलंय.

Similar News