अनुप जलोटाचा लोटा

Update: 2018-09-21 09:25 GMT

अनुपम भक्तीरसात श्रोत्यांना भावुक करणाऱ्या अनुप ने त्या पुण्याचा लोटा बरोबर एनकॅश करीत सर्व पुरुष वर्गाचा "जे" फॅक्टर असा काही खवळवला कि अनेक पोटे ढवळ ढवळ ढवळली ,आणि टीकेची भडीमार उठली ,

जेलसी दाय नेम इज वूमन अस पुरुष म्हणतात पण आता ?

त्याने नाव कमावल ,पैसा कमावला ,त्यासाठी दमछाक लागेपर्यत ऐसी लागी लगनची आळवणी केली ,हरीचा नामजप इतके अनंत वेळा झाला कि त्या हरीला त्याला पावण्यावाचून गत्यंतर उरल नाही ,त्या हरीने मग पैसा प्रसिध्दी प्रिया या सर्वांची खैरात केली त्याच्यावर !

हे जे वाले पुरुषांनो ,अशी जिंदगी वेचावी लागते ,लगन लागावी लागते ,तेल्हांच पैसा मिळतो प्रासिद्धी मिळते अन प्रेयसीही मिळते

कष्ट करावे लागतात कष्ट त्यासाठी !

पण हल्ली खूप पूर्वीच्या फॅशन्स फारच लोकप्रिय होताहेत

पायजम्याचे पलाझो ,फ्रॉक च्या कुर्तीज् ,धोतरासारख्या सलवारी ! तशीच पूर्वाची एक फैशन जरठकुमारी विवाहाची आता लोकप्रीय होतीय एवढच !

म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान ! ते संगीत गोविंद बल्लाळ देवलांच संगीत शारदा आठवा ,अहो माझे आजे सासरे ५४ वर्षाचे तर आजे सासूबाई १४

४० वर्षाच अंतर असूनही चांगली ८ पोर झाली

सध्याची तुला पाहते रे ही झी टीव्हीवरची मालिका प्रौढ नायक व कोवळी तरूणी ,हायेस्ट टीआरपी ओढतीय

त्यामुळे तरुण वर्गात प्रौढ दिसायची फॅशन आलीय ,केस पांढरे करुन ,वजन वाढवून पोढ पुढे आणत ,डोळ्याला मोठ्ठा चष्मा लावत जो तो प्रौढ़ दिसू पाहतोय ,तरुण पोरगी गटवण्यासाठी !

पण बच्चमजी ,येडया समजू नका या पोरींना ,ल्ई हुश्शार असतात त्या ,

म्हातारा झालाय ,खपेल लवकर ,मग त्याच्या भरपूर इस्टेटी वर ऍश करू जिंदगीभर असा साधा सरळ व्यवहारी हिशोब असतो त्यामागे ! उगाच हुरळून जाऊ नका

वाईट एवढयाच गो ष्टींच वाटतय असा तरुण राजपुत्र आमच्या साररव्या प्रौढ स्त्रीच्या आयुष्यात कधी कसा आणि केव्हां येणार हो?

प्रतिभा दाते

Similar News