वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्मृती इराणींच्या विरोधात गुन्हा दाखल

Update: 2018-10-27 14:37 GMT

दोन दिवसांपूर्वी केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील ठाकूर चंदन सिंग यांनी गुरुवारी स्मृती इराणी यांच्यासह महिलांना मंदिर प्रवेशाला विरोध करणार्‍या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

ठाकूर चंदन सिंग यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, इराणी यांनी संपूर्ण महिला वर्गाला अपवित्र संबोधने चांगले नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय दिला होता. शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देशात गाजत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आल्यानंतर तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल? असा सवाल केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर महिलांना प्रवेशापासून रोखण्यात आलं होतं.

Similar News