अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन तब्बल ८ वर्षांनंतर एकत्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या आगामी 'गुलाब जामून' सिनेमात हि जोडी एकत्र दिसणार आहे. अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना या दोघांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.
एका इव्हेंट दरम्यान अभिषेक बच्चनने आपल्या करिअर आणि सिनेमांबाबत आपलं म्हणणे मांडले. त्यावेळी अभिषेकला दिग्दर्शनक्षेत्रात येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिषेक म्हणाला सध्या मला अभिनयावर फोकस करायचे आहे. मात्र त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनला दिग्दर्शन करायचे आहे. यावेळी अभिषेकने शूटिंग दरम्यान ऐश्वर्या मेकिंगच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर कसे लक्ष देते. सिनेमाच्या शॉटला घेऊन ती कशी अलर्ट असते. शॉट संपल्यानंतर तो नीट झाला आहे की नाही ते ती कशी तपासून बघते याबाबतही सांगितले.