बॉलिवूडमधील बऱ्याच जोड्या चाहत्यांना आकर्षित करत असतात. चाहत्यांच्या आदर्श जोड्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय जोडी ती म्हणजे अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची जोडी. त्यांच्या कामाबद्धल, त्यांच्या प्रेमाबद्धल नेहमीच चाहत्यांना कुतुहल वाटत असते. सोशल मिडीयावर त्यांचे आदर्श जोडी म्हणून चर्चा देखील असते. परंतू सध्या अभिनेता भजय देवगण व काजोल वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
अजय देवगणच्या एका चुकीच्या पोस्टमुळे त्याची पत्नी काजोल चांगलीच हैराण झाली आहे. अजयने सोमवारी सायंकाळी आपल्या पत्नी काजोलचा व्हॉट्सअॅप नंबर सोशल मीडियावर टाकला आणि क्षणार्धात नंबर व्हायरल होऊन काजोलला फोन, मॅसेजेसने हैराण केले. तिचा नंबर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. अजयने आपल्या ट्विटरवर 'काजोल देशात नसून तिच्यासोबत संपर्क साधण्यासाठी तिचा व्हॉट्सअप नंबर' असे ट्वीट केले आहे.
यासर्व प्रकारामुळे अजय देवगन याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. हा सर्व प्रकार अजयकडून चुकीने झाला की काही इतर कारण यामागे आहे यासंदर्भातील माहिती तुर्तासतरी मिळालेली नाही.