राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अनेक दिग्गज नेते सोडचिठ्ठी देत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादीची पूर्ण भिस्त यंग ब्रिग्रेडवर अवलंबून असणार आहे.
या संदर्भात राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रविकांत वर्पे आणि मुंबई युवक प्रदेशाध्यक्ष Adv निलेश भोसले यांची मतं जाणून घेतली. यावेळी त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत 15 युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगत विदर्भात राष्ट्रवादीचे 10 आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: नागपूर सोडून मुंबईत सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याचा दावा केला आहे.
पक्षातील काही नेते पक्ष सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादीतील यंग ब्रिग्रेडला संधी मिळणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी युवकच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.