सध्या सर्व उद्योग धंदे मंदीत असताना सोन्यामधून मोठ्या प्रमाणात परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. मात्र, या गुंतवणूकीत जोखीम आहे. विशेष बाब म्हणजे मार्केट म्हटलं तर जोखीम आलीच. मात्र, सध्याच्या घडीला सोन्याचे भाव वाढत असताना सोन्यामध्ये कितपत गुंतवणूक करावी? जास्त परतावा मिळेल म्हणून अनेक लोक सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
बाकी सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंदी आहे. म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणता धोका संभावतो? अशा वेळी काय काळजी घ्यावी. पाहा जळगाव येथील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी स्वरुप कुमार लुंकड यांनी केलेलं विश्लेषण