राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता ते विधानसभेची भोकर या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत.
भाजपने माजी आमदार बापूसाहेब गोरठेकरांना, तर 'वंचित'ने नामदेव आईलवारांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेत पराभव झालेल्या अशोक चव्हाण यांनी आता आपल्या मतदार संघात तळ ठोकला आहे.
कॉंग्रेसचे नेते इतर पक्षाच्या प्रचारात सहभागी होताना दिसत नाहीत. भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांना ही निवडणूक जड जाईल असं बोललं जात होतं. मात्र, अशोक चव्हाण यांनी विरोधकांना नमतं केल्याचं बोललं जात आहे. काय आहे अशोक चव्हाण यांच्यासमोरची आव्हान, कॉंग्रेस या निवडणुकीत पुन्हा भरारी घेईल का? पाहा ‘टू द पॉइंट’ मध्ये मॅक्समहाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियदर्शिनी हिंगे यांनी अशोक चव्हाण यांच्याशी केलेली बातचित