मोदींना रोखण्यात अपयश आलं तर काँग्रेस संपली पाहिजे असं मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलंय. त्याच बरोबर देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसने आपली ताकत नसतानाही निवडणूक लढवली, काँग्रेसने आघाड्या का केल्या नाहीत, कधीकाळचे मित्रपक्ष यांना सोबत का घेतलं नाही, त्यांची मतं का खाल्ली.. एक्झिट पोलच्या अंदाजावरून आता काँग्रेसला टीकेचं लक्ष्य केलं जात आहे, या तसंच इतरही महत्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा.