अर्णब गोस्वामी वेडा झाला आहे का ??

Update: 2020-09-06 15:09 GMT

अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांचे काही व्हिडीयो त्यांच्या टीम ने सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. सून संजय राऊत, (sanjay raut) सून अनिल देशमुख, (anil deshmukh) ऐ उध्दव ठाकरे, (uddhav thackeray) मैं तुम्हें पैंग्वीन नहीं कहता, मेरे साथ वन टू वन करो …बाह्या सरसावत आव्हानात्मक भाषेत बोललेली अर्णब गोस्वामी या न्यूज़ अँकरची ही काही वाक्ये.

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही ने सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात शिवसेनेच्या एका नेत्याचा हात असल्याचा आरोप करत बातम्यांची मालिका सुरू केली आहे. हे आत्महत्या प्रकरण नसून हत्याच आहे या निष्कर्षांसह अर्णब गोस्वामी ने वार्तांकन सुरू केलं आहे. दरम्यान स्टुडीयो मध्ये जोरजोरात ओरडणं, बाह्या सरसावणं, आव्हान देणं, एकेरीवर बोलणं, सातत्याने तुम - तुम म्हणणं, एकदम उखाड लो क्या उखाड सकते हो या स्टाइलने फिल्मी डायलॉग मारणं अशा पद्धतीने अर्णबचं अँकरिंग सातत्याने सुरू आहे. याबाबत आम्ही काही मानसोपचार तज्ज्ञांशी बोललोय.

अशा पद्धतीचं वागणं हा मानसिक आजार आहे का? काय बोलतायत मानसोपचार तज्ज्ञ पाहूयात हा मानसिक आजार आहें की नवी पत्रकारिता की कुठल्या तरी राजकीय पक्षाची सुपारी? अर्णबच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होतात. आणखी एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मुंबईत राहून शिवसेनेशी, ठाकरेंशी पंगा घ्यायचा, त्यांना आव्हान द्यायचं जेणेकरून टीआरपी वाढेल, झालाच तर शिवसेना आपल्या लौकिकाला जागली तर एखादा हल्ला ही होईल.

तो हल्ला ओढवून आणायचा अर्णब गोस्वामी याचा प्रयत्न दिसतोय. सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांना एकेरीत बोलून उकसवण्यात अर्णबचा हल्ला ओढवून आणण्याचा हेतूच दिसतोय. सध्या तरी शिवसेनेने अतिशय संयमाने अर्णबच्या हल्ल्याचा सामना केलेला आहे. कदाचित अर्णबच्या आकांड-तांडवामागे हे ही कारण असू शकेल. कदाचित स्क्रीनवर जे सुरूय तो अर्णबचा अभिनयही असू शकेल. पण स्क्रीन वर जे दिसतंय त्यावरून अर्णबचं मानसिक संतुलन ठीक नाही असंच म्हणावं लागेल.

Full View

Similar News