राज्याला सक्षम विरोधी पक्ष द्य़ा असं म्हणत राज ठाकरे, निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. काही ठिकाणी त्यांना राष्ट्रवादीने साथ दिली आहे.
राज ठाकरे यांनी बेलापूर मतदारसंघातून गजानन काळे यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. मात्र, गणेश नाईक यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षाने गणेश नाईक यांचा पत्ता कट करुन मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली.
त्यातच शिवसेनेने नवी मुंबईतील या जागेवर आपला हक्क सांगितला होता. मात्र, शिवसेनेला ही जागा मिळाली नाही. त्यामुळे शिवसेना भाजपच्या पाठीशी किती उभा राहणार? हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळं या ठिकाणी मनसेला मोठी संधी असल्याचं बोललं जात आहे.
काय आहे बेलापूर मतदारसंघात मनसेची रणनिती पाहा, मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी मनसे उमेदवार गजानन काळे यांच्याशी केलेली ‘टू द पॉइंट’ चर्चा