आज उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचं नेतृत्व स्विकारण्याची विनंती करून त्यांचं नाव जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सूचित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी शिवतिर्थावर होईल. असं सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल. आज या घडीला बाळासाहेब ठाकरे असायला हवं होते. असं म्हणत बाळासाहेबांची आठवण काढली.
हे ही वाचा...
सत्तासंघर्ष LIVE : फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या संध्याकाळी 5 वा. अग्निपरीक्षा
संविधान दिवस : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांऐवजी घटना दुसऱ्या कोणी लिहिली असती तर…
मी राजीनामा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 78 तासांमध्ये कोसळलं. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठक झाली. या बैठकीत या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी असं अधिकृत नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांच्या आदेशवजा सूचनेप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवण्यात आलं. तसंच या सुचनेला कॉंग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिलं.