उल्हासनगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडून अनेक इच्छूक उमेदवार आहेत. यामध्ये आमदार ज्योती कलानी, भरत राजवानी आणि ओमी कलानीजर यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
या मतदारसंघातून पप्पू कलानी हे ३ वेळा तर त्यांची पत्नी ज्योती कलानी या २ वेळा निवडून आलेल्या आहेत. २०१४ मध्ये ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती न झाल्याने भाजप उमेदवार कुमार आयलानी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अवघ्या १८०० मतांच्या फरकाने ज्योती कलानी यांचा विजय झाला होता.
या मतदारसंघात आता ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छूक नसून भाजपच्या तिकिटावर त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. दुसरा पर्याय म्हणजे त्यांना तिकीट न मिळाल्यास त्यांचा मुलगा ओमी कलानी किंवा सून पंचम कलानी (विद्यमान महापौर) यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी कलानी कुटुंबियांनी केली आहे.
https://youtu.be/tzazTFw678g