उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचं नेतृत्व स्विकारण्याची विनंती करून त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडून उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाचा पत्ता बदलण्याता मार्ग अखेर खुला केला.
हे ही वाचा...
महाराष्ट्रातील भाजपा सरकारविरोधात विरोधी पक्षांकडून निदर्शनं
कुटुंबाला वाळीत टाकलं म्हणून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
अजित पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवध्या 78 तासांमध्ये कोसळलं. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठक झाली. या बैठकीत या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी असं अधिकृत नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांच्या आदेशवजा सूचनेप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवण्यात आलं.