सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील विदर्भातल्या १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात होईल. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडावे म्हणून एकूण ११ हजारांवर सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे.