केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यात सरकारने दोन अटी मान्य केल्या तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन असं मोठं वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळेल असा भाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ५० टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षात मिळालेला नाही.
कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल आणि शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला 50 टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करावा आणि हमीभावानुसार शेतमाल खरेदी करावा, या दोन अटी मान्य केल्यास भाजपमध्ये प्रवेश करु,, अश गुगली बच्चू कडू यांनी टाकली आहे.