मराठा क्रांती मोर्चाची ज्या कोपर्डीच्या घटनेने ज्योत पेटली. ती माणुसकीला काळींबा फासणारी घटना म्हणजे कोपर्डी येथील तरुणीवर झालेला अमानुष अत्याचार. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. आता या निर्णयाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केलं आहे.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी समोर आली. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देखील मिळालं. राज्यात सामाजिक तणाव देखील निर्माण झाला. राज्याचं वातावरण या घटनेनं ढवळून निघालं. मात्र, त्यानंतर ज्या कोपर्डीमध्ये ही घटना घडली. त्या कोपर्डी गावाकडं नेत्यांबरोबरच, माध्यमाचं देखील दुर्लक्ष झालं.
या घटनेला आता काही वर्षे उलटून गेली. कोपर्डीवासियांना अनेक आश्वासनं देण्यात आली. ही आश्वासनं पूर्ण झाली का? या संपुर्ण घटनेबाबत कोपर्डीवासियांना काय वाटतं? दुष्काळाने होरपळलेल्या या गावाची सदस्थिती, गावातील तरुणांवर का आली आहे बेरोजगारीची कुऱ्हाड? मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘मॅक्समहाराष्ट्र’चे संपादक रविंद्र आंबेकर यांनी थेट कोपर्डी येथे जाऊन कोपर्डीवासियांच्या भावना जाणून घेतल्या पाहा... दु:खाच्या वेदना सहन करणाऱ्या कोपर्डीवासियांचा जाहीरनामा थेट कोपर्डीतून.