शरद पवारांनी रिटायर व्हावं - गोपीचंद पडळकर

Update: 2019-10-17 15:34 GMT

वंचित आघाडीची साथ सोडून भाजपमध्ये परत आलेल्या गोपीचंद पडळकर बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पडळकर आमचे वाघ आहेत आणि वाघाने बारामतीत उभं राहिलं पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना बारामतीतून उमेदवारी दिली.

अजित पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे त्यातच बारमतीमध्ये धनगर समाज जास्त असल्यानं गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली असं बोललं जात आहे.

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी तर घेतली मात्र, पडळकर अजित पवार यांच्या समोर तगडं आव्हान उभं करु शकती का? काय आहे गोपीचंद पडळकर यांच्या समोरील बारामतीतील आव्हानं? गोपिचंद पडळकर यांचा निवडणुकीतील अजेंडा काय? पाहा गोपिचंद पडळकर यांची मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत

Full View

Similar News