डूबते हुए को तिनके का सहारा: GDP, स्टेट बॅक ऑफ इंडियाचा अहवाल मोदी सरकारला दिला देणार का?

Update: 2020-09-02 13:55 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची इकॉनोमी 5 Trillion Doller Economy चं स्वप्न दाखवत असले तरी देशाच्या जीडीपीत सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठी ऐतिहासिक घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि कोरोना महामारीचे संकट यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून २०२०-२१ या तिमाहीत भारताचा जीडीपी शून्याच्या खाली -२३.९ टक्के (India GDP minus 23.9 percent). इतका खाली आला आहे.४० वर्षांत देशाचा GFP पहिल्यांदाच इतक्या खाली आहे. आता GDP म्हणजे काय? हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. एकूणच अर्थव्यवस्था वाढीचा दर जो लॉकडाऊन पूर्वी सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्य़ा म्हणण्यानुसार 4.5 टक्के होता. जानेवारी ते मार्चमध्ये 3.1 टक्के होता. असं स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल सांगतो. ते सगळे अंदाज खोटे ठरवून तो 23.9 टक्क्यावर पोहोचला आहे.

थोडक्यात 2.20 लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी 23.9 टक्क्यांनी खाली आला असेल तर किती लोक बेरोजगार झाले असतील. उद्योगधंद्यांची नवीन गुंतवणूक सोडा किती उद्योग बंद पडले असतील याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे डिमांड अँड सप्लाय ही साखळी पूर्णपणे बंद झाली आहे. असं मत बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलं.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालानुसार 2021 या आर्थिक वर्षात GDP वजा 10.9 % असेल. त्यांचा या वर्षाचा अंदाज GDP उणे 6.9% होता. भारतीय अर्थव्यवस्थेचे सरकारचे आकडे पहिल्या तिमाही चे (April- May- June 2020 ) जीडीपी( GDP) उणे 23.9% टक्क्यांनी आकुंचन पावली आहे. SBI चा अहवाल अशाच बिकट परिस्थितीत समोर आल्यानंतर हा अहवाल आणि या अहवालातील आकडेवारीपेक्षा देशाची अर्थव्यवस्था आणखी खाली ढासळलेली असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात बॅकींग तज्ञ विश्वास उटगी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचित केली. पाहुयात काय म्हटलंय उटगी यांनी

Full View

Similar News