रवी तुपकरांचा राजू शेट्टींना पुन्हा दे धक्का... 

Update: 2019-09-28 09:47 GMT

रविकांत तुपकर यांनी दोन दिवसांपुर्वी आपला राजीनामा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या हाती सोपवून मोठा धक्का दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्या नंतर तुपकर हे महत्वाचे व्यक्ती असल्याचं मानलं जात होतं.

राजीनामा देण्यापूर्वी त्यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanavis)यांच्या सोबत झाल्यामुळे त्यांचा भाजप (BJP) पक्षात प्रवेश होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आज मुंबई येथे तुपकर यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला आहे.

https://youtu.be/hHJoN1JMHs4

 

राजू शेट्टी यांचे जुने सहकारी आणि सध्याचे कट्टर विरोधक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश करून रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी राजू शेट्टींना आता दुसरा धक्का दिलाय. आज मुंबई येथे रयत क्रांती संघटनेच्या (Rayat Kranti Sanghatana) कार्यकर्ता मेळाव्यात तुपकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला आहे. तुपकर यांच्या या पक्षप्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी (Swabhimani Shetkari Sanghatana) मात्र विदर्भात मोठी पोकळी निर्माण होणार हे नक्की...

Similar News