अयोध्या निकालावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Update: 2019-11-09 08:59 GMT

अयोध्येतील रामजन्म भूमितील वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचा ऐतिहासीक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे घटनापीठाच्या अध्यक्षतेखाली झाली. या घटनापीठात न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे, न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती एस. अब्दुल नजीर यांचा या खंडपीठात समावेश आहे.

या प्रकरणातील पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर पर्यायी जागा अयोध्या इथं उपलब्ध करून देण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने केंद्र व उत्तर प्रदेशच्या सरकारला दिले आहेत. या प्रकरणातील आणखी एक पक्षकार असणाऱ्या निर्मोही आखाड्य़ाचा दावा यावेळी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसंच या प्रकरणातील तिसरे पक्षकार निर्मोही आखाडा यांचे जागेवरचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं.

या संपुर्ण निकाला संदर्भात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आज बाळासाहेब असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता, ज्यांनी या करता बलिदान दिल ते आज सार्थकी लागले आहे. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे...Full View

Similar News