‘हे’ सरकार फक्त ५ वर्ष नाही तर, ५० वर्ष टिकेल – छगन भुजबळ

Update: 2019-11-27 14:13 GMT

अजित पवार (Ajit pawar) यांनी काल रात्री शरद पवारांची (shard pawar) भेट घेतली अणि पुन्हा राष्ट्रवादीत सामील झाले. आज विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी अजित पवार यांनीही शपथ घेतली. आभार प्रदर्शनाच्या दरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अजित पवार यांच्या परतीवर आनंद व्यक्त केला आहे.

हे ही वाचा...

या दोघांनी ‘करून दाखवलं’!

हे तेच अजित पवार आहेत का?

औट घटकेचे मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं सांगितलं होत. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अजित पवारांच्या घरवापसीची प्रतिक्षा लागली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली. कार्यकर्त्यांनीही अजित पवारांच्या नावाने फलकबाजी केली होती.

“अजित पवारांनी परत पक्षामध्ये यावं अशी सगळ्यांची तीच इच्छा होती. आमचं सरकार फक्त ५ वर्ष नाही तर, ५० वर्ष टिकेल. आम्ही तिन्ही पक्ष शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करणार आहोत.” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे.

Full View

 

Similar News