'सुबह का भुला शाम को घर आ गया', अजित पवार शरद पवारांच्या भेटीला !

Update: 2019-11-26 16:50 GMT

अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 78 तासांमध्ये कोसळलं. मात्र, अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये सक्रीय होणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कायम आहे. त्यातच अजित पवार शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी पोहोचले आहेत.

हे ही वाचा

उद्धव ठाकरेंचा पत्ता बदलणार

पत्रकारांवर हल्ला कराल तर सावधान! तीन वर्षासाठी खावी लागणार जेलची हवा…

अजित पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

'सुबह का भुला शाम को घर आ जायें तो उसे भुला नहीं कहते' अजितदादांनी राष्ट्रवादीसाठी मोलाचं काम केलं आहे. त्यांनी भाजपसोबत जाऊन बंडखोरी जरी केली असली तरी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार कोसळलं आहे, त्यामुळे आपल्याला संधी मिळाली, अशी आठवणही भुजबळांनी करून दिली.

मात्र, या घटनेला तासही उलटत नाही. तेच अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या ठिकाणी पोहोचले आहेत.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संयुक्त बैठक झाली. या बैठकीत या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी असं अधिकृत नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचं नेतृत्व स्विकारण्याची विनंती करून त्यांचं नाव जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सूचित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार या ठिकाणी नव्हते. पक्ष स्थापनेपासून अजित पवार हे पक्षामध्ये आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या मनात अजित पवार नसल्यानं एक खंत होती. ही खंत छगन भूजबळ यांनी बोलून दाखवली होती.

दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी शिवतिर्थावर होईल. असं सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल. आज या घडीला बाळासाहेब ठाकरे असायला हवं होते. असं म्हणत बाळासाहेबांची आठवण काढली.

Full View

Similar News