विजेच्या शॉक पेक्षा वीज बिलाचा शॉक लोकांना अधिक लागल्याच्या भावना सोशलमीडिया अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यामध्ये सर्व सामान्य ग्राहक ते कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होऊन सरकारला सवाल करत आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांना मोठ्याप्रमाणात आलेलं बील कसं भरणारं? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ग्राहकांना वीज बिलाचे हफ्ते करण्याची परवानगी ही दिली. मात्र, ग्राहकांना ऐरवी येणाऱ्या वीज बिलापेक्षा हे हफ्ते अधिक आहेत.
यावरुन सरकारवर आणि वीज वितरण कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होतायेत. विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अद्यापपर्यंत हा प्रश्न सरकार आणि वीज वितरण कंपन्या सोडू शकल्या नाही. या संदर्भात आम आदमी पार्टी ने www.hisaabdo.in अशी वेबसाईट सुरु करुन वीज बिला संदर्भात मोहिम सुरु केली आहे.
या मोहिमेतंर्गत ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात. ही तक्रार थेट उर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू शकता. एकंदरित काय आहे ही मोहिम? यावर आप नेते धनंजय शिंदे यांनी ग्राहकांना माहिती दिली असून या मोहिमेत तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. पाहा हा व्हिडिओ...
राज्यसरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत २०० युनिट पर्यंतचे वीज बील जनतेला माफ करण्याचा आदेश काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा यासाठी आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेला संघटित करून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. यात www.hisaabdo.in या वेबसाईट च्या माध्यमातून आपण आपल्या बिलाची दिल्लीतील बिलाशी तुलना करून राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री, वीज नियामक मंडळ व संबंधित वीज कंपन्यांना ईमेल पाठवू शकतो.