अलिबागमधील कोळीवाड्यातील महिलांची नादुरूस्त रस्ते, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेबाबतच्या तक्रारी आहेत. सरकारी योजना आमच्यापर्यंत पोचतच नाहीत, असं या महिला सांगतात. आयेशा नावाची मच्छीमार महिला म्हणते, लोकांनी न सांगता लोकांसाठी काम करणारं सरकार हवं. यंदाच्या पावसात वादळाने मोठं आर्थिक नुकसान केल़ं, पण शेतकऱ्यांना जशी नुकसानभरपाई मिळते, तशी ती कोळ्यांना मिळत नाही, असाही सूर जनतेच्या जाहिरनाम्यात पुढे आलाय, तर ज्या शिवराय भिमरावांचं नाव राजकारणी सतत घेतात, त्याला साजेसा लोकाभिमुख कारभार करणारं सरकार हवं, अशी अपेक्षा प्रा. प्रेम आचार्य यांनी व्यक्त केलीय. जनतेचा जाहिरनामा अलिबाग विधानसभा मतदारसंघातून राज असरोंडकर यांच्यासोबत...