आमदारानेच फोडले EVM, ईव्हीएमचे तुकडे

Update: 2019-04-11 08:24 GMT

सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 7 मतदार संघांचा समावेश असून अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. देशात किरकोळ घडामोडी सोडता सर्वत्र शांततेत मतदान सुरु असताना आंध्र प्रदेशात जन सेना पक्षाचे उमेदवार आमदाराने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमचीच तोडफोड केली आहे.

आज आंध्र प्रदेशमधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र होत असून आंध्र प्रदेशातील 175 विधानसभा आणि 25 लोकसभा जागांसाठी एकाच दिवशी मतदान होत आहे. त्यामुळे आमदार मधुसूदन गुप्ता यांनी लोकसभा आणि विधानसभा असा दोनही ठिकाणी मतदान करायचे होते. नेमकं इथंच घोळ झाला...

नक्की काय झालं?

मधुसूदन गुप्ता हे पवन कल्याण जन सेना पक्षाचे आंध्रप्रदेश विधानसभेचे आमदार आहेत. मधुसूदन गुप्ता हे अनंतपूर जिल्ह्यात गुंटकाल विधानसभा मतदारसंघात गुटी इथं मतदानासाठी गेले होते. त्यावेळी तिथे लोकसभा आणि विधानसभा मतदानाबाबत नीट फलक लावले नसल्याने ते निवडणूक कर्मचाऱ्यांवर संतापले. आणि त्यांनी ईव्हीएम उचलून जमिनीवर आपटलं आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने आमदार मधुसूदन गुप्तांना ताब्यात घेतले आहे.

Similar News