निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद ? राजू परुळेकर

Update: 2019-04-26 06:48 GMT

निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांना समान न्याय असतो. मात्र निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचं यंदाच्या निवडणूकीत दिसून येतंय. काळजीवाहू पंतप्रधान असून सुद्धा मोदी सरकारमध्ये हस्तक्षेप करत आहेत. निवडणूकीच्या काळामध्ये ईडी, सीबीआयला मुक्त हस्ते वापर होत असल्यातं दिसतंय. निवडणूकीच्या काळामध्ये सर्वसमान यंत्रणा असली पाहिजे मात्र तसं दिसून येत नसल्याचा आरोप निवडणूक आयोगावर लावण्यात येतोय. निवडणूक आयोगाचा निवडणूकीवर वचक राहिलेला नाही. त्यामुळं विषम तत्त्वांची लढाई या निवडणूकीत पाहायला मिळत असल्याचं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी केलय.

Full View

Similar News