अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच यावर एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली.
आयुष्यभर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मी टीका केली, त्यांच्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला, त्यांच्यासोबत राहण्याची दुर्दैवी वेळ आज माझ्यावर आली आहे. अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज जळगावात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
हे ही वाचा
97 हजार कोटी – 72 हजार कोटी = अजित पवारांवर आता 25 हजार कोटींचा आरोप
अजित पवार आणि भाजपा मध्ये नक्की डील काय झालंय…
Maha Political Twist LIVE: सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला, उद्या निकाल…
या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी नेहमीप्रमाणे आपल्या सडेतोड शैलीत स्वकियांसह विरोधकांचा समाचार घेतला. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात मी ज्या लोकांवर तसेच पक्षांवर टीका केली. आज त्यांच्यासोबत राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे, ज्या काँग्रेसने जन्मापासून शिवसेनेवर जातीयवादी पक्ष म्हणून टीका केली, तीच काँग्रेस आज शिवसेनेसोबत गळ्यात गळा घालत आहे. असा चिमटाही खडसेंनी यावेळी काँग्रेसला काढला. आज सत्तेसाठी ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पाहता 'सत्तातूरांना न भय, न लज्जा', अशी परिस्थिती असल्याची जळजळीत टीकाही त्यांनी केली.