आतापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एन्रॉन, भूखंड घोटाळा, तेलगी घोटाळा या सारख्या अनेक प्रकरणात आरोप झाले. मात्र, या सर्व प्रकरणांतून ते तेल लावलेल्या पैलवानासारखे बिनदिक्कतपण शरद पवार निसटले. आताही शरद पवार यांच्यावर शिखर बॅंक घोटाळ्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानिमित्ताने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या हा चर्चेचा विषय आहे. शरद पवार यांच्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे भाजपवर सध्या विरोधकांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला जात आहे.
या संदर्भात शरद पवारांना भाजप कडून अडकवलं जात आहे का? काय आहे संपुर्ण प्रकरण? पाहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे विश्लेषण ‘द निखिल वागळे शो’ मध्ये