मध्यप्रदेशमध्ये भाजप ने कॉंग्रेस मध्ये असंतुष्ट असणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांना गळाला लावत कमलनाथ यांच्या सरकारला सुरुंग लावला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रेस ची सत्ता गेल्यात जमा असल्याची चर्चा आहे. मात्र, मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रेस ची सत्ता जात असताना काँग्रेस आत्मचिंतन करायला का धजत नाही? कॉंग्रेस ची ‘देव देतो कर्म नेतो’ अशी परिस्थिती का झाली आहे? पाहा मॅक्समहाराष्ट्र चे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांचे परखड विश्लेषण अर्धमेल्या कॉंग्रेसला झटका!