करोना विषाणूचा कहर थांबता-थांबेना... जगभरात करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लस संशोधन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून करोना लसीसंदर्भात अनेक बातम्या आपण सतत वर्तमान पेपर, टीव्ही चॅनल्स वर पाहतोय. मात्र खरच करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणारेय? असा प्रश्न तुम्हाला–आम्हाला पडलेला आहे.
काय आहे लस संशोधनाची प्रक्रिया? संशोधन करणाऱ्या पाच कंपन्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यात असल्या तरी ते यशस्वी होईल का? लसीच्या बाबतीत घाई करणं योग्य की अयोग्य? भारतात कधी होणार लस तयार? सरकारची भूमिका काय असावी आणि सामान्यांनी कोणत्या ५ गोष्टी करणं महत्वाचे आहे सांगतायेत डॉ. संग्राम पाटील... पाहा हा व्हिडिओ.