कोरोनावरील लस आल्यानंतर त्या लसीचे डोस खरेदी करण्याकरीता आणि प्रत्येक नागरिकाला ती लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे पुढील वर्षात 80 हजार कोटी रुपये आहेत का? असा सवाल अदर पुनावाला यांनी विचारला होता. अदर पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आहेत.
तसंच कोरोनावरील ऑक्सफर्डच्या सर्वाधिक चर्चेतील लसीच्या निर्मितीमध्ये सिरम इन्स्टिट्यूचाही सहभाग आहे. त्यामुळे अदर पुनावाला यांनी विचारलेल्या या प्रश्नामुळे नवीन चर्चेला सुरूवात झाली. अदर पुनावाला यांनी सोशल मीडियावर हा सवाल उपस्थित करत पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले होते.
एकंदरीत या प्रश्नानिमित्त करोना लसीची किंमत किती असू शकते आणि इतर देशांमध्ये अशा लसी देण्यासाठी तिथली सरकार काय तयारी करत आहे. तसेच भारताची काय परिस्थिती आहे यावर डॉ. संग्राम पाटील यांनी केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण नक्की पाहा...