देशाची अर्थव्यवस्थता ढासळली असून अर्थव्यवस्था सुधारण्याएवजी भाजपा सरकार काँग्रेसवर आरोप करण्यात बिझी आहे. डॉ मनमोहन सिंह यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला डॉक्टर प्रमाणे सांभाळलं तर मोदी सरकार तिला सर्कस प्रमाणे हाताळत आहे. त्यामुळे देशात आर्थिक आणिबाणी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
देशात आर्थिक आणीबाणी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशाप्रमाणे कर्जबुडव्यांची नावे जाहीर करावीत तसंच बँकांचे घोटाळे आणि बुडत्या अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रिका काढावी अशा तीन मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.