विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत डॉ.अमोल पवारांचं मोठं वक्तव्य

Update: 2019-11-01 09:43 GMT

पुणे पदवीधर मतदार संघातील सदस्य चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार पदी निवडून आलेत, त्यामुळे ती जागा रिक्त होऊन जून महिन्यात होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पलूस मधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमोल पवार यांनी या निवडणुकीची तयारी चालवली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.

एवढ्या मोठ्या पसार्‍याचं डॉक्टर पवार कसं आव्हान पेलणार, याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता, विधान परिषदेवर राजकीय लोकांची वर्णी न लागता समाजातील अभ्यास व कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे किंबहुना विधानपरिषदेची संकल्पना त्यासाठीच आहे, असं विधान डॉक्टर पवार यांनी केलं आहे. पदवीधरांचे प्रश्न प्रलंबित असून आजवर ज्यांना संधी मिळाली त्यांचं दुर्लक्ष झालेले असल्यामुळे आपण ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असं डॉक्टर अमोल पवार यांनी मॅक्स महाराष्ट्रला सांगितलं.

Full View

Similar News