सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, पण अचूक नाही ( Supreme but not infallible ) या जस्टीस वर्मा यांच्या पुस्तकाच्या कव्हरपेजचं ट्वीट असाउद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नापसंती ही ओवैसी यांनी व्यक्त केली आहे. भारत हिंदूराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असल्याची प्रतिक्रीया ओवैसी यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पत्रकारांनी रामदेव बाबांचा उल्लेख केल्यानंतर ओवैसी यांनी रामदेव बाबांच्या जाहीराती का कमी होतायत याची चिंता करावी, पत्रकारांनी ही बाबांच्या जाहीराती कमी झाल्याने आपल्या पगाराची चिंता करावी असं ओवैसी यांनी म्हटलं. यावर एका पत्रकाराने आमच्या जाहीराती कमी झालेल्या नाहीत असं सांगताच तुम्हारा बाबा से क्या जुगाड हैं असा प्रतिप्रश्न ही ओवैसी यांनी विचारला.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं काँग्रेसने स्वागत केल्याबदद्ल ओवैसी यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काँग्रेसने भाजपाची साथ दिलीय असा आरोप ही त्यांनी केला आहे. आज हा विषय चालला उद्या दुसरा विषय येईल तो ही काही वर्षे चालेल.. या देशाला हिंदूराष्ट्र बनण्यापासून रोखणं माझं काम आहे आणि मी ते करणार आहे, असं ही ओवैसी यांनी स्पष्ट केलं आहे.