राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात मोठी घडामोड घडली. आज रात्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हटलं असलं तरी, अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचा विधीमंडळ गटनेता या नात्यानं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटर हेडवरील एक पत्र राज्यपालांना दिलं असून त्यावर राष्ट्रवादीच्या एकूण 54 आमदारांच्या सह्या आहेत. अजित पवार यांनी दिलेले हे पत्र आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यासाठी दिलं आहे.