ईडीच्या भीतीला आम्ही दबणार नाही - जयंत पाटील

Update: 2019-10-31 15:49 GMT

राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी जनतेनं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे,आम्ही विरोधीपक्षाचीच भूमिका बजावणार असं मतं त्यांनी व्यक्त केलं.त्याचबरोबर वातावरण काही असलं तरी वातावरण बदलण्याची क्षमता किती असते ते संपूर्ण महाराष्ट्राने या निवडणुकीत पाहिलं. आम्ही नेहमी सांगायचो की आमच्याकडे शरद पवार नावाचा नेता आहे.त्या नेत्यामुळे महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं असं जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत आपलं मत व्यक्त केलं.

Full View

Similar News