मावळ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ टक्के मतदान

Update: 2019-04-29 08:20 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी मावळ (maval) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Loksabha election) लढवण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर चर्चेत आलेल्या मावळ लोकसभा (loksabha) मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३.८५ टक्के मतदान झालं आहे.

त्यात चिंचवड या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३५.०८ टक्के तर पनवेल विधानसभा मतदारसंघात ३१.९० टक्के, उरणमध्ये ३१.४० टक्के, पिंपरीमध्ये ३१.१० टक्के, मावळमध्ये ३०.१० टक्के, कर्जतमध्ये २९.५० टक्के इतकं मतदान झालेलं आहे. महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील एकूण सतरा लढतीपैकी मावळ लोकसभेच्या लढतीकडे महाराष्ट्राचं (maharashtra)लक्ष लागलंय. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यात खरी लढत असल्याचं चित्र मावळ लोकसभा मतदारसंघात आहे.

Similar News