जालन्यात ईव्हीएम यंत्रासोबत सेल्फी घेणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलंय.. अंबड तालुक्यातील खडकेश्वर इथं एका तरुणानं मतदान करताना सेल्फी फोटो घेतला त्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. बाळासाहेब धोंडीभाऊ उबाळे असं या तरुणाचं नाव आहे..
मतदान करताना बाळासाहेब यांनी फोटो घेतला आणि बाहेर जावून तो लोकांना आपण कुणाला मतदान केलं हे दाखवत होता.. त्यामुळं निवडणूकीच्या गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी बाळासाहेब उबाळे या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई पोलीस करताहेत..